Tuesday, August 30, 2011

Marathi Love Song - हलकेच दबक्या पावलांनी येतेस

हलकेच दबक्या पावलांनी येतेस
त्याची एक झलक बघायला
चंद्राच्या मागे लपून
त्याला न दिसायला

तोही वाट पाहत असतोच
दिवसभर जळुन थकलेला असतो
डोंगराच्या, ढगाच्या आड लपून
तुलाच पाहण्यासाठी टपलेला असतो

चांदण्यांचा आवाज होऊ नये म्हणून
त्यांना कवेत घेऊन येतेस
तुलाही त्रास होऊ नये म्हणून
त्यानेही आग शमवलेली असते

चंद्र मग मुद्दाम त्याला
टाटा बाय बाय करून खिजवत असतो
तुझ्याबरोबर चंद्राला पाहिल्यावर
jealous होऊन तोही लालबुन्धा होऊन जातो

चंद्राच्या एक कानाखाली वाजवावी
असे मग त्याला वाटत राहते
त्यातच मग हळूच लाजून
तुझी चांदण्यांची खळी पडते

तुला प्रेमपत्र लिहावं म्हणून
आभाळात काहीतरी गिरवत बसतो
नंतर पाहील कुणीतरी म्हणून
स्वतःच्याच हाताने पुसून टाकतो

बराच वेळ वाट बघून
मग तो कंटाळतो
तू समोर येत नाहीस म्हणून
समुद्रात बुडून जातो

तो असा रागावून गेल्यावर
मग तू माझ्याकडे येतेस
तुझी अबोल प्रीती
माझ्यापुढे उलगडतेस

तू पण ना किती छळतेस त्याला
सांगून टाक ना लवकर
तो बिचारा चंद्राचा राग
काढत बसतो आग ओकून दिवसभर

मी तरी की सांगतोय तुला
तुझ्यासारखच माझंही
प्रेम करतो तिच्यावर पण
सांगू शकत नाही तिला काहीही........

0 comments: